Pranali Kodre
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल मैदानात दुसरा कसोटी झाला.
या सामन्यात खेळताना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने एमएस धोनीचा मोठा विक्रम मागे टाकला आहे.
इशानने या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली.
इशानने या खेळीदरम्यान 33 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.
त्यामुळे इशान कसोटीमध्ये चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत धोनीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
धोनीने 2006 मध्ये फैसलाबादला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटीत 34 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
कसोटीमध्ये चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ऋषभ पंत आहे.
ऋषभ पंतने 2022 मध्ये बंगळुरूला झालेल्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.