Akshata Chhatre
डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण अनेकांना एक समान अनुभव येतो; एखाद्या विषयावर बोलल्यानंतर लगेच त्याची जाहिरात स्क्रीनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन खरोखर आपलं बोलणं ऐकतो?
अनेक ॲप्स तुमच्या फोनच्या मायक्रोफोन, कॅमेरा आणि लोकेशनचा ॲक्सेस मागतात, ज्याचा उद्देश 'वैयक्तिकृत जाहिरात' दाखवणे हा असतो.
कंपन्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मायक्रोफोनने संभाषण ऐकण्याऐवजी, आम्ही तुमची सर्च हिस्ट्री, ॲप वापर आणि लोकेशन या डेटाचा वापर करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
तुम्ही कोणत्या वेबसाइट्स पाहता, काय सर्च करता किंवा कोणत्या पोस्ट लाइक करता, यावरून अल्गोरिदम तुमच्या आवडीचा अंदाज लावतात. तुमच्या फोनचं GPS तुम्ही कुठे जात आहात यावर लक्ष ठेवून असते आणि त्यानुसार जाहिरात दाखवते.
गोपनीयतेचा भंग आणि कडक कायदे. जर एखादं ॲप तुमच्या परवानगीशिवाय तुमचं बोलणं ऐकत असेल, तर तो गोपनीयतेचा गंभीर भंग मानला जातो.
तुम्हाला तुमच्या गोपनीयतेची काळजी वाटत असेल, तर हे ४ सोपे उपाय लगेच करा: अनावश्यक ॲप्सना मायक्रोफोन, कॅमेरा आणि स्थान यांचा ॲक्सेस त्वरित नाकारा. 'ओके गुगल' किंवा 'हे सिरी'सारखे व्हॉइस कमांड निष्क्रिय करा.
संभाषणादरम्यान फोन इंटरनेट किंवा वायफायशी जोडलेला नसेल तर डेटा संकलनाची शक्यता कमी होते. तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हीपीएन सॉफ्टवेअर वापरा.