केस वाढण्यासाठी ट्रिम करणं खरंच महत्वाचं आहे का?

Akshata Chhatre

काळेभोर आणि दाट केस

लांबसडक, काळेभोर आणि दाट केस हे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य वाढवतात आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच आकर्षक छटा देतात. त्यामुळेच केस निरोगी ठेवणं आणि त्यांची योग्य निगा राखणं आवश्यक ठरतं.

does trimming help hair grow | Dainik Gomantak

हेअर मास्क

या उद्देशाने आपण वेगवेगळे शॅम्पू, ऑईल, हेअर मास्क आणि स्पा अशा अनेक उत्पादने वापरतो. मात्र तरीदेखील अनेकदा केस गळणे, तुटणे किंवा वाढ थांबणे अशा समस्या उद्भवतात.

does trimming help hair grow | Dainik Gomantak

ट्रिम केल्याने वाढ

महिलांना वाटतं की केस वारंवार कापल्याने म्हणजेच ट्रिम केल्याने केसांची वाढ जलद होते, पण हे खरं कितपत आहे?

does trimming help hair grow | Dainik Gomantak

वाढण्याची प्रक्रिया

खरंतर केस वाढण्याची प्रक्रिया ही आपल्या डोक्यावरील त्वचेतील मुळांशी (फॉलिकल्सशी) संबंधित असते, केस फक्त टोकांपासून कापले जातात, त्यामुळे केस वाढायला थेट मदत होत नाही.

does trimming help hair grow | Dainik Gomantak

संतुलित आहार

केस वाढ चांगली होण्यासाठी संतुलित आहार, पोषक तत्वं, योग्य झोप आणि तणावमुक्त जीवनशैली महत्त्वाची असते.

does trimming help hair grow | Dainik Gomantak

कोरडी टोकं

तरीही केस कापणं गरजेचं का असतं? कारण यामुळे फाटलेली, कोरडी टोकं काढून टाकली जातात, ज्यामुळे केस अधिक निरोगी, मऊ आणि व्यवस्थित दिसतात.

does trimming help hair grow | Dainik Gomantak

पावसाळ्यात येणारे किडे ठरतात त्रासदायक? कडुलिंब करेल 'छूमंतर'

आणखीन बघा