Akshata Chhatre
आजकाल अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात गरम चहाने होते आणि बऱ्याच वेळा पालक आपल्या लहान मुलांनाही चहा देतात.
बालवयातील मुलांसाठी चहा आरोग्यदृष्ट्या योग्य आहे का, याबद्दल जागरूकता आवश्यक आहे.
मुलांना चहा देणं टाळावं, कारण यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.
उदाहरणार्थ, जर १०-१२ किलो वजनाच्या लहान मुलाला एक कप चहा दिला, तर त्याची भूक कमी होते आणि तो मुख्य आहार टाळतो.
मुलं फक्त बिस्किटं किंवा नमकीन खाऊ लागतात, पण डाळ-भात, फळं किंवा भाज्यांकडे दुर्लक्ष करतात.
त्यांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही, वजन वाढत नाही आणि सतत आजारी पडण्याचा धोका वाढतो.
चहात असणारे कॅफिन मुलांच्या झोपेच्या सवयी बिघडवते आणि शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता वाढते.