Akshata Chhatre
आयुर्वेदानुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जेवणापूर्वी गरम पाण्याचे छोटे घोट घेतल्याने पचनक्रिया सक्रिय होते.
गरम पाण्याने पचनासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
छोट्या घोटांनी गरम पाणी पिल्यास अन्न सहज पचते.
थंड पाणी 'जाठराग्नी' मंद करते त्यामुळे जेवणात किंवा नंतर थंड पाणी टाळा.
कमीत कमी ३० मिनिटांनीच पाणी प्या, जेणेकरून पचनक्रिया योग्य प्रकारे होईल.
जिरे, धने, बडीशेप यांचे काढे किंवा उकळलेलं पाणी पचनास मदत करते. अत्याधिक पाणी पिल्यास पोषकतत्त्वांचं शोषण कमी होतं आणि पचनशक्ती कमी होते.