गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री, गायिका सबा आझाद रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसून येतात.
सबा आणि हृतिक पालक बनण्याची तयारी करत आहेत का, याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. त्याला कारण ठरली आहे सोशल मीडिया पोस्ट
सबाने तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये व्हु इज युअर गायनॅक? म्हणजे तुमचा गायनॅकोलॉजिस्ट कोण आहे, असे विचारले आहे.
सबाच्या या प्रश्नामुळे हृतिक आणि सबाच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना सबा प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न पडला आहे.
काही नेटकऱ्यांनी तर थेट या पोस्टवर काही गुडन्यूज आहे का, ज्युनियर हृतिक येणार आहे का, असे प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी, आधी लग्न करा, मग डॉक्टरकडे जा असे, सुचविले आहे.
तर काही लोकांनी हे कुठल्यातरी वेबसीरीजचे प्रमोशन गिमिक असावे, असा तर्क लढवला आहे.
काही दिवसांपुर्वी त्यांनी लग्न केल्याची अफवा पसरली होती. सबा अनेकदा रोशन कुटूंबियांसमवेत हँगआऊट कताना दिसते.