Rahul sadolikar
5 सप्टेंबर 1971 रोजी पंजाबमधील मालेरकोटला येथे जन्मलेला इर्शाद आज एक विलक्षण गीतकार म्हणून सर्वांना परिचित आहे.
इर्शाद कामिल यांचे प्राथमिक शिक्षण मालेरकोटला येथे झाले. कॉलेजमध्ये मित्रांची प्रेमपत्रे लिहुन देणारा इर्शाद पुढे भावनांची ताकद कागदावर मांडू लागला.
मालेरकोटला येथून पदवी घेतल्यानंतर इर्शाद कामिलने पंजाब विद्यापीठातून एमए केले. त्यानंतर त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि पीएचडीही केली. त्यांनी द ट्रिब्यून आणि इंडियन एक्स्प्रेस सारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले,
चंदिगडमधील एका व्यक्तीनं त्याला व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर इर्शादला दिल्लीला बोलावलं आणि मुंबईला घेऊन जाऊ असं सांगितलं. मात्र, इर्शाद दिल्लीला पोहोचल्यावर ती व्यक्ती त्यांना भेटायला आली नाही
यानंतर इर्शाद कामिलने मुंबईचे तिकीट काढले आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विमान प्रवास केला.
त्याची मुंबईत दिग्दर्शक इम्तियाज अलीशी भेट झाली. त्यांची मैत्री इतकी वाढली की त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
इर्शाद कामीलने रॉकस्टार, हैदर, आक्रोश, सुलतान, सोचा न था या चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे.