Akshata Chhatre
दैनंदिन जीवनात तणाव, थकवा आणि चिंता यामुळे मनावर ताण येतो, पण तुम्ही काय खाता याचा तुमच्या मूडवर थेट परिणाम होतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?
संशोधनानुसार काही खाद्यपदार्थ मेंदूत आनंदी हार्मोन्स तयार करतात आणि तणाव कमी करतात.
उदाहरणार्थ, केळ्यामधील ट्रिप्टोफॅन सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होऊन मन प्रसन्न ठेवतो, तर फायबर आणि पोटॅशियम ऊर्जा संतुलित ठेवतात.
काजूमधील मॅग्नेशियम मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून थकवा आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.
डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स रक्तप्रवाह सुधारून सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि मूड हलका करतात, मात्र ते प्रमाणात खाल्लं पाहिजे.
ताक, दही किंवा आंबवलेल्या भाज्या पचन सुधारतात, चांगले जंतू वाढवतात आणि थेट मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.
तसेच पालक, मेथी, ब्रोकोलीसारख्या हिरव्या पालेभाज्यांतील फोलेट मूड स्विंग्स कमी करून मानसिक आरोग्य सुधारतात