Pranali Kodre
आजकाल सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे.
आयपीएलमधील सर्व संघांचे देखील इंस्टाग्रामवर अकाऊंट्स आहेत, ज्याला लाखो क्रिकेट चाहते फॉलो करतात.
इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या आयपीएल संघांमध्ये मुंबई इंडियन्स अव्वल क्रमांकावर असून या संघाला 11.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
तसेच चेन्नई सुपर किंग्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेला 11.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला इंस्टाग्रामवर 9.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांना 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.
त्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स असून त्यांना इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
सनरायझर्स हैदराबादला इंस्टाग्रामवर 3 मिलियन युजर्स फॉलो करतात.
राजस्थान रॉयल्सला 2.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.
पंजाब किंग्सला देखील राजस्थान इतकेच म्हणजे 2.8 मिलियन फॉलोवर्स इंस्टाग्रामवर आहेत.
आयपीएल 2022 चा विजेता संघ गुजरात टायटन्स संघाला इंस्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
या यादीत सर्वात शेवटी लखनऊ सुपर जायंट्स असून त्यांना 1.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.