Pranali Kodre
आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप प्रदान केली जाते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक तीन वेळा ऑरेंज कॅप डेव्हिड वॉर्नरने जिंकली आहे. तसेच ख्रिस गेलने दोन वेळा ऑरेंज कॅप पटकावली आहे.
वॉर्नरने आयपीएल 2015 (562 धावा), आयपीएल 2017 (641 धावा), आयपीएल 2019 (692 धावा) या तीनवर्षी ऑरेंज कॅप जिंकली आहे.
ख्रिस गेलने आयपीएल 2011 (608 धावा) आणि आयपीएल 2012 (733 धावा) अशी सलग दोन हंगामात ऑरेंज कॅप जिंकली आहे.
तसेच आत्तापर्यंत केवळ पाचच भारतीय खेळाडूंना ऑरेंज कॅप जिंकता आली आहे.
सचिन तेंडुलकर (आयपीएल 2010 - 618 धावा), रॉबिन उथप्पा (आयपीएल 2014 - 660 धावा), विराट कोहली (आयपीएल 2016 - 973 धावा), केएल राहुल (आयपीएल 2020 - 670 धावा) आणि ऋतुराज गायकवाड (आयपीएल 2021 - 635 धावा) या भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅप जिंकली आहे.
गेल आणि वॉर्नरसह एकूण सात परदेशी खेळाडूंनी ऑरेंज कॅप जिंकली आहे.
शॉन मार्श (आयपीएल 2008 - 616 धावा), मॅथ्यू हेडन (आयपीएल 2009 - 572 धावा), माईक हसी (आयपीएल 2013 - 733 धावा), केन विलियम्सन (आयपीएल 2018 - 735 धावा) आणि जोस बटलर (आयपीएल 2022 - 863 धावा) या परदेशी खेळाडूंनी प्रत्येकी एकदा ऑरेंज कॅप जिंकली आहे.