IPL 2025: किंग कोहली बेस्ट! विराटने नोंदवला शानदार रेकॉर्ड

Manish Jadhav

आयपीएल 2025

आयपीएल 2025 मधील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी (10 एप्रिल) खेळला गेला.  

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटचा जलवा

यंदाच्या हंगामातही आतापर्यंत विराटची शानदार खेळी पाहायला मिळाली आहे. त्याने या सामन्यातही आपला जलवा दाखवून दिला.

virat kohli | Dainik Gomantak

विराटचा विक्रम

दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने चौकार मारताच एक शानदार विक्रम नोंदवला. विराट आता चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी पोहोचला.

Virat Kohli

पहिला खेळाडू ठरला

विराटने आपल्या खेळीत एक चौकार आणि षटकार लगावला. यासह 1000 (चौकार/षटकार) पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला.

virat kohli | Dainik Gomantak

चौकार आणि षटकार

विराटने या लीगमध्ये आतापर्यंत 249 डावांमध्ये 721 चौकार आणि 280 षटकार मारले आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटनंतर कोण?

चौकार आणि षटकार मारण्याच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने 211 डावांमध्ये 768 चौकार आणि 152 षटकार मारले आहेत. 

Virat Kohli | Dainik Gomantak

सर्वाधिक धावा

विराट सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

Virat Kohli | Dainik Gomantak