Rishabh Pant ची दिल्ली कॅपिटल्सला बंगळुरूमध्ये 'ग्रेट भेट'

Pranali Kodre

भारतात सध्या आयपीएल 2023 हंगाम सुरू असून या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ सलग 4 पराभवांमुळे संघर्ष करताना दिसत आहे.

Delhi Capitals | Dainik Gomantak

सध्या दिल्ली संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 15 एप्रिलला होणाऱ्या सामन्यासाठी तयारी करत आहे.

Delhi Capitals | Dainik Gomantak

अशातच दिल्ली संघाची ऋषभ पंतने बंगळुरूमध्ये भेट घेतली आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

पंतने दिल्ली संघाची सराव सत्रादरम्यान घेतलेल्या भेटीदरम्यानचे फोटो आयपीएलच्या सोशल मीडिया हँडेल्सवर शेअर करण्यात आले आहेत.

Rishabh Pant | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये दिसते की पंत दिल्ली संघातील अनेक खेळाडूंशी संवाद साधत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Rishabh Pant | Dainik Gomantak

पंत 4 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यासाठीही उपस्थित होता.

Rishabh Pant | Dainik Gomantak

त्यावेळीही त्याने उजव्या गुडघ्याला वैद्यकिय पट्ट्यांनी पूर्ण बांधलेले दिसत होते.

Rishabh Pant | Dainik Gomantak

पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला अनेक जखमा झाल्या होत्या, Dainik Gomantak

Rishabh Pant | Dainik Gomantak

तसेच त्या अपघातानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.

Rishabh Pant | Dainik Gomantak

सध्या तो या दुखापतींमधून सावरत आहे. त्याचमुळे पंत क्रिकेटपासूनही दूर आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे तो दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार आहे, पण सध्या तो उपलब्ध नसल्याने डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे नेतृत्व करत आहे.

David Warner | Dainik Gomantak
Albie Morkel | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी