Pranali Kodre
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाजा ऋषभ पंतला तब्बल चार महिन्यांनी चाहत्यांना स्टेडियममध्ये पाहायला मिळाले.
पंत सध्या अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून सावरत आहे.
डिसेंबर 2022 च्या अखेरीस दिल्लीहून रुडकीला येताना पंतचा गंभीर कार अपघात झाला होता. त्याला या अपघातात अनेक जखमाही झाल्या.
या अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे पंत क्रिकेटपासून सध्या दूर आहे. तो जवळपास या संपूर्ण वर्षात क्रिकेटपासून दूर राहण्याचीच शक्यता आहे.
दरम्यान, पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार आहे. पण सध्या दुखापतीतून सावरत असल्याने संघातून बाहेर आहे.
मात्र, संघातून बाहेर असूनही तो संघाला पाठिंबा देत असून मंगळवारी (४ एप्रिल) तर तो अरुण जेटली स्टेडियवर आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठीही उपस्थित होता.
तो अपघातानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर आल्याने अनेक चाहत्यांना त्याला पाहून आनंद झाला.
दरम्यान, दुखापतीतून सावरत असताना आत्तापर्यंत पंतला अनेक क्रिकेटपटूही भेटून गेले आहेत.