Pramod Yadav
गोव्यात 20 नोव्हेंबरपासून 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होणार आहे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत घोषणा केली.
नऊ दिवसांच्या महोत्सव कालावधीत 270 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कार दिला जाणार आहे.
महोत्सवात सुरुवातीला यूके थ्रिलर 'कॅचिंग डस्ट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तर, 2023 च्या यूएस बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा 'द फेदरवेट' सह महोत्सवाची सांगता होईल.
आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट प्रदर्शित केले जातील, 53 व्या महोत्सवापेक्षा 18 अधिक आहे.
यावर्षी 13 जागतिक प्रीमियर, 18 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 62 आशिया प्रीमियर आणि 89 भारतीय प्रीमियर होणार आहेत.