Rahul sadolikar
आज कॉफी भारतात इतकी लोकप्रिय झाली आहे की, सकाळी उठल्यावर कॉफीशिवाय चैनही न पडणारे अनेकजण आपल्या आजुबाजूला दिसतील.
मराठी विश्वकोषानुसार कॉफीचा शोध इथिओपियात नवव्या शतकाच्या उत्तरार्धात लागला असावा. तिच्या शोधासंबंधी अनेक कथा, दंतकथा प्रसिद्ध आहेत. कॉफीवर कुराणात बंदीचा उल्लेख आहे.
भारतात कॉफी 1600 च्या सुमारास आणली गेली. मक्केहून आलेल्या बाबा बुढण नावाच्या एका मुसलमान फकिराने आणलेल्या कॉफीचे बिया कर्नाटक राज्यातील चंद्रगिरी टेकड्यांवर लावण्यात आले.
कॉफीच्या लागवडीचा पुढे विस्तार होत गेला. कर्नाटकातील कॉफीच्या लागवडीखालील काही डोंगराळ भाग आजही या फकिराच्या नावाने ओळखला जातो.
कर्नाटकातल्या याच मळ्यातून नेलेल्या रोपांपासून 1700 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने कॉफीची लागवड सुरू झाली असे म्हणतात. ब्राझीलमधील कॉफीची लागवडही गोव्यातून नेलेल्या रोपांपासून सुरू झाली असावी असे म्हणतात.
1799 साली ईस्ट इंडिया कंपनीने प्रयोगासाठी तेलचेरी येथे कॉफीची लागवड केली. ती यशस्वी झाल्यामुळे दक्षिण भारतातील घाटांच्या उतारावर पद्धतशीर लागवडीस प्रारंभ झाला.
1872 च्या सुमारास म्हणजे भारतात कॉफी आल्यापासून सु. पावणे तीनशे वर्षांनी येथून २५,००० टन कॉफी निर्यात करण्यात आली