Pranali Kodre
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल सध्याचा सर्वात आघाडीच्या आणि लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याच् जन्म 3 जून 1986 रोजी झाला.
डाव्या हाताने टेनिस खेळणारा नदाल अन्य सर्व कामे मात्र उजव्या हाताने करतो. त्याच्या काका टोनी नदाल यांनी तो दोन्ही हाताने फोरहँडचे फटके दोन्ही बाजूंनी खेळत असल्याचे पाहिले होते. त्याचवेळी त्यांना जाणवले त्याचा उजव्या हाताचा बॅकहँड त्याची ताकद बनू शकते.
राफाचे काका मिगल एजंल नदाल प्रोफेशनल फुटबॉलपटू होते. त्यामुळे घरातूनच फुटबॉलचं बाळकडू त्याला मिळालं होतं. पण त्याने वयाच्या 12 व्या वर्षी फुटबॉल ऐवजी टेनिसची निवड केली.
राफाने वयाची 15 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच ग्रँड स्लॅम चॅम्पियन पॅट कॅशला एका प्रदर्शनिय सामन्यात पराभूत केले होते.
राफाने 2008 मध्ये स्पेनसाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे.
राफा खूप श्रद्धाळू असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तो सामन्यावेळी त्याच्या पाण्याच्या बाटल्या अगदी व्यवस्थित आणि ठरवलेल्या पद्धतीनेच ठेवताना दिसतो.
राफाने त्याच्या कारकिर्दीत विक्रमी 14 वेळा लाल मातीत होणारी फ्रेंच ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. तसेच त्याने लाल मातीत होणारी माँटे कार्लो मास्टर्स 11 वेळा आणि बार्सिलोना ओपन 12 वेळा, रोम मास्टर्स 10 वेळा या प्रमुख स्पर्धा जिंकल्यात.
राफा जोकोविचसह सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा खेळाडूला आहे. या दोघांनीही प्रत्येकी 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
नदालने 14 फ्रेंच ओपन व्यतिरिक्त 2 विम्बल्डन, 2 ऑस्ट्रेलियन ओपन आणि 4 अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
नदालने 2019 मध्ये मारिया फ्रान्सिस्का पेरेलो हिच्याशी लग्न केले. त्यांना आता एक मुलगाही आहे.