हाय व्होल्टेज मॅचआधी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचा भाईचारा

Pranali Kodre

आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सप्टेंबर रोजी सामना रंगणार आहे.

India vs Pakistan | Twitter

श्रीलंकेतील कँडीमधील पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

India vs Pakistan | Twitter

या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघातील काही खेळाडूंमध्ये भाईचारा दिसून आहे.

India vs Pakistan | Twitter

भारत आणि पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली.

India vs Pakistan | Twitter

या भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

India vs Pakistan | Twitter

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ यांची भेट चर्चेचा विषय ठरली.

India vs Pakistan | Twitter

India vs Pakistanविराटने 2022 टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२ चेंडूत ३१ धावांची गरज असताना रौफच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकत सामन्याचे पारडे भारताकडे झुकवले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीची चर्चा रंगली.

Virat Kohli | Twitter

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांचीही भेट झाली.

India vs Pakistan | Twitter

मोहम्मद सिराज आणि हॅरिस रौफ यांनीही भेट घेत एकमेकांशी गोलंदाजीबद्दल चर्चा केली.

India vs Pakistan | Twitter
Trishala Gurung | Dainik Gomantak