Akshay Nirmale
INSV तारिणी ही नौका गोव्यात बनली होती. ऑगस्टमध्ये ही नौका सागर सफरीवर गेली होती.
सात महिन्यांमध्ये तब्बल 17,000 नॉटिकल मैल (31 हजार 484 किलोमीटर) प्रवास या नौकेने केला आहे.
गोव्यात या नौकेचा फ्लॅग इन सोहळा पार पडला.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी नौकेचे स्वागत केले.
या नौकेवर क्रू मध्ये सहा जणांचा समावेश होता. यामध्ये दोन महिला लेफ्टनंट कमांडरही होत्या.
या नौकेवरील कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, निखिल हेगडे, दिलना के., रूपा ए. यांसह कमांडर दिव्या पुरोहित, कमांडर झुल्फिकार यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
आगामी काळात नौदल या नौकेवरून एका महिलेला जगभ्रमंती मोहिमेवर पाठवणार आहे.