Akshata Chhatre
त्वचेशी संबंधित समस्यांवर उपाय करण्यासाठी बाजारातील रासायनिक उत्पादनांवर पैसे खर्च करणे ही सामान्य सवय आहे. पण अनेकदा ही उत्पादने हवा तसा परिणाम दाखवत नाहीत.
जर तुम्हीही अशा समस्यांनी त्रस्त असाल, तर महागड्या उत्पादनांवर पैसे वाया घालवणे थांबवा आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातील हळदीचा वापर सुरू करा.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि करक्यूमिन सारखे शक्तिशाली घटक असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
हळद वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांमध्ये मिसळून वापरल्यास त्वचेच्या ५ मोठ्या समस्या दूर होतात.
हळद आणि कॉफी एकत्र करून लावल्यास त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वरित चमक येते. हळदीतील करक्यूमिन मेलेनिनचे उत्पादन संतुलित करते, तर बेसन घाण काढून टॅनिंग कमी करते.
हळद आणि ज्येष्ठमध पावडर लावल्यास त्वचेचा रंग एकसमान होतो आणि सूज कमी होते. हळद आणि तांदळाचे पीठ नियमित लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
कोरफड जेलमध्ये हळद मिसळून लावल्यास अतिरिक्त तेल शोषले जाते, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.