Pramod Yadav
गौतम अदानी भारताचे पहिले centibillionaire म्हणजेच 100 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असलेले उद्योजक बनले आहेत.
31 डिसेंबर 2019 ला अदानी समुहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटल) दोन लाख कोटी रुपये होतं.
सप्टेंबर 2022 मध्ये त्यानं मोठी उसळी घेतली आणि हा आकडा 20.74 लाख कोटी रुपयांवर गेला.
अदानी समुहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवलात 2019 से 2022 दरम्यान त्यात दहा पटीनं वाढ झाली आहे.
गौतम अदानी जेव्हा 15-16 वर्षांचे होते, तेव्हा आधी ते सायकलवर आणि नंतर स्कूटरवरून कपडे विकण्यासाठी जायचे.
अहमदाबादमधील अत्यंत वर्दळीच्या बाजारपेठेत गौतमभाई कपड्यांचे व्यावसायिक होते.
शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या अदानींच्या सात कंपन्यांचे बाजार मूल्य 235 अब्ज डॉलर (नोव्हेंबर 2022 मध्ये) आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा हा आकडा मोठा आहे.