गोमन्तक डिजिटल टीम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाबाबत आपण वाचले असेलच. या चक्रीवादळाचा वेग ताशी 90 किलोमीटर होता.
चक्रीवादळ प्रचंड वेगानं तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागाकडे सरकत होते आणि काल त्याचा प्रभाव पाहण्यात आला.
'फेंगल'मुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय काल घेण्यात आला, प्रभावित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
देशातील ज्या भागांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार होता अशा ठिकाणी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फेंगल शब्दाचा अर्थ उदासीन असा होतो, हा अरेबिक शब्द आहे.
वादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन टोल-फ्री क्रमांक-112 आणि 1077- सेट केले गेले आहेत.
फेंगल प्रभावित काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.