गोमन्तक डिजिटल टीम
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची भारताचा मिस्टर 360 अशी ओळख आहे.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळायचा. चार पैकी तीन वर्ष तो संघाचा उपकर्णधार होता.
2018 साली मेगा ऑक्शनमध्ये सूर्यकुमार यादवला मुंबईने 3.2 कोटी इतकी किंमत मोजून खरेदी केले.
सूर्याच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे. आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याआधी त्याने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे.
सूर्यकुमार यादव सध्या T20 विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे.
सूर्यकुमारची प्रत्येक खेळी स्फोटक आणि वादळी असून, भारतीय संघासाठी त्याचे योगदान अतिशय महत्वाचे ठरत आहे.
सूर्यकुमार T20 विश्वचषक स्पर्धेक सर्वात आक्रमक आणि प्रभावी खेळाडू म्हणून पुढे आला आहे.