International Cricket मध्ये सर्वाधिक धावा करणारे 7 भारतीय क्रिकेटर

Pranali Kodre

रोहितच्या 18 हजार धावा

भारताचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना 87 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने 18 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.

Rohit Sharma

पाचवा खेळाडू

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहित शर्मा

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 457 सामन्यांमध्ये 43.46 च्या सरासरीने 18040 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 664 सामन्यांमध्ये 48.52 सरासरीने 34357 धावा केल्या आहेत.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

विराट कोहली

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 26121 धावांसह विराट कोहली आहे. विराटने या धावा 513 सामन्यांमध्ये 53.96 सरासरीने केल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

राहुल द्रविड

राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 509 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 45.41 सरासरीने 24208 धावा केल्या आहेत.

Rahul Dravid | Dainik Gomantak

सौरव गांगुली

सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 424 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 41.46 सरासरीने 18575 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly | Dainik Gomantak

एमएस धोनी

या यादीत सहाव्या क्रमांकावर 17266 धावांसह एमएस धोनी आहे. त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44.96 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

MS Dhoni | Dainik Gomantak

विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने 374 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 40.31 च्या सरासरीने 17253 धावा केल्या आहेत.

Virender Sehwag | Dainik Gomantak

विराट का झाला शाकाहारी?

Virat Kohli | Twitter