Pranali Kodre
बीसीसीआयने 12 जुलैपासून सुरुवात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात केली आहे.
वनडे आणि कसोटी मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे.
कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तो जवळपास दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी उपकर्णधार बनला आहे.
हार्दिक पंड्याकडे वनडे मालिकेसाठी उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.
भारताच्या कसोटी संघात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. ऋतुराजला कसोटीशिवाय वनडे संघातही संधी मिळाली आहे.
तसेच चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडू कसोटी संघातून वगळण्यात आले आहेत.
कर्णधार रोहित शिवाय विराट कोहली, शुभमन गिल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, इशान किशन, मोहम्मद सिराज हे खेळाडू कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात आहेत.
बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला देखील वनडे आणि कसोटी अशा दोन्ही संघात संधी देण्यात आली आहे.
कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, सुर्यकुमार यादव यांना केवळ वनडे संघात स्थान मिळाले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.