Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळला गेलेला कसोटी सामना चेतेश्वर पुजाराचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना ठरला.
चेतेश्वर पुजारा कारकिर्दीत 100 कसोटी सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा 13 वा भारतीय खेळाडू आहे.
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर असून त्याने 200 कसोटी सामने खेळले आहेत.
त्यानंतर राहुल द्रविडने 163 कसोटी सामने खेळले आहेत.
या यादीत 134 कसोटी सामन्यांसह व्हीव्हीएस लक्ष्मण आहे.
त्याच्या पाठोपाठ अनिल कुंबळे असून त्याने 132 कसोटी सामने खेळले आहेत.
कपिल देव पाचव्या क्रमांकावर असून त्यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत.
सुनील गावसकर यांनी 125 कसोटी सामने खेळले आहेत.
दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामने खेळले आहेत.
सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुली 113 सामन्यांसह 8 व्या क्रमांकावर आहे.
या यादीत 9 व्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 106 सामने खेळले आहेत.
तसेच इशांत शर्माच्या नावावर 105 कसोटी सामने आहेत.
त्यापाठोपाठ हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 103 कसोटी सामने खेळले आहेत.