Manish Jadhav
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात आतापर्यंत भारतीय टेस्ट संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलने बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
आज (3 जुलै) आम्ही तुम्हाला त्या टॉप-5 भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नावावर वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके झळकावण्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत पहिले नाव टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माचे आहे, ज्याने WTC च्या इतिहासात एकूण 40 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला 69 डावांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि या काळात त्याने 9 शतके झळकावली. WTC च्या इतिहासात रोहित शर्माने 41.15 च्या सरासरीने एकूण 2716 धावा केल्या आहेत.
शुभमन गिल आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याने 34 कसोटी सामने खेळले आहेत आणि 62 डावांमध्ये फलंदाजी करत 7 शतके झळकावली आहेत. गिलने आतापर्यंत 38.60 च्या सरासरीने 2162 धावा केल्या आहेत. गिलने WTC मध्ये 7 अर्धशतकांच्या खेळी देखील केल्या आहेत.
या यादीत ऋषभ पंतचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत WTC च्या इतिहासात 6 शतके झळकावली आहेत. पंत आणि गिल यांच्यात निकराची स्पर्धा सुरु आहे. पंतने 36 कसोटी सामने खेळले असून 63 डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने 42.86 च्या सरासरीने 2529 धावा केल्या आहेत.
WTC च्या इतिहासात भारतासाठी शतके झळकावण्याच्या बाबतीत यशस्वी जयस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. जयस्वालने आतापर्यंत 21 कसोटी सामन्यांच्या 39 डावांमध्ये फलंदाजी करताना 5 शतके झळकावली आहेत. जयस्वालने WTC मध्ये एकूण 1990 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 53.78 आहे.
या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहलीने वर्ल्ड कपच्या इतिहासात 46 कसोटी सामन्यांच्या 79 डावांमध्ये फलंदाजी करताना 53.78 च्या सरासरीने 2617 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर एकूण 5 शतके आहेत.