Pranali Kodre
भारतीय फुटबॉल संघाने गेल्या काही दिवसात चांगली कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने नुकतीच SAFF चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली. यानंतर भारतीय संघाची रँकिंग सुधारली आहे.
भारतीय संघ आता जागतिक रँकिंगमध्ये 99 क्रमांकावर आला आहे.
साल 2018 नंतर पहिल्यांच भारताची रँकिंग 100 च्या आत आली आहे.
भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम रँकिंग 94 आहे. साल 1996 साली भारताने ही रँकिंग मिळवली होती.
भारतीय संघ 1993 मध्येही 99 क्रमांकावर, 2017 मध्ये 96 व्या क्रमांकावर होता. गेल्या महिन्यात 100 ही भारताची रँकिंग होती.
भारतीय संघाने 2023 मध्ये ट्राय नेशन कप, इंटरकॉन्टिनेन्टल कप आणि SAFF चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली आहे.