Pranali Kodre
बुडापेस्ट, हंगेरी येथे वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेत भारतीय 4x400 मीटर रिले पुरुष संघाने मोठा विक्रम केला आहे.
सेमीफायनल हिटमध्ये 2 मिनिटे 59.05 सेकंदाचा वेळ नोंदवत भारतीय संघ अमेरिकेच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
त्यामुळे भारतीय संघही रविवारी अंतिम फेरीत धडक मारताना नवा आशियाई विक्रमही नोंदवला.
भारतीय संघाने जपानचा आशियाई विक्रम मोडला आहे.
जपानने गेल्यावर्षी युजिन, युएसएमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 2:59.51 सेकंद वेळ नोंदवत आशियाई विक्रम प्रस्तापित केला होता.
भारतीय संघात मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकॉब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे.
आता भारतीय रिले संघ रविवारी मध्यरात्री 1 वाजून 7 मिनिटांनी सुरु होणाऱ्या अंतिम फेरीत खेळताना दिसेल.