India Hockey: गोलकिपर पीआर श्रीजेशची स्पेशल 'ट्रिपल सेंच्यूरी'

Pranali Kodre

भारताचा फायनलमध्ये प्रवेश

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 11 ऑगस्ट रोजी भारतीय हॉकी संघाने जपानला 5-0 ने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

India Hockey Team | Twitter

खास सामना

चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेला हा सामना भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेशसाठी खास ठरला.

PR Sreejesh | Twitter

300 वी कॅप

पीआर श्रीजेशचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता.

PR Sreejesh | Twitter

सन्मान

याबद्दल पीआर श्रीजेशचा सामन्यापूर्वी मैदानात जागतिक हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम, हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप टिर्की आणि सचिव भोला नाथ सिंग यांच्या हस्ते खास सन्मानही करण्यात आला.

PR Sreejesh | Twitter

अनुभवी खेळाडू

सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी असलेल्या श्रीजेशने 2010 साली नवी दिल्लीत झालेल्या वर्ल्डकपमधून पदार्पण केले होते. तेव्हापासून तो संघातील प्रमुख खेळाडू राहिला आहे.

PR Sreejesh | Twitter

मोठ्या स्पर्धांमधील सहभाग

श्रीजेशने 2010, 2014, 2018 आणि 2023 अशा 4 वर्ल्डकप स्पर्धा खेळल्या आहेत. तो 2014, 2018 आणि 2022 या वर्षी झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेतही खेळला आहे.

PR Sreejesh | Twitter

ऑलिम्पिक

तसेच श्रीजेश लंडन 2012, रियो 2016 आणि टोकियो 2020 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक कांस्य पदक जिंकून देण्यातही त्याचा मोठा वाटा होता.

PR Sreejesh | Twitter

पुरस्कार

श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानही गौरविण्यात आले आहे. तो 2021 आणि 2022 मध्ये सर्वोत्तम गोलकिपरही ठरला आहे.

PR Sreejesh | Twitter
Yashpal Sharma | Dainik Gomantak