Pranali Kodre
भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री 3 ऑगस्ट रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सुनील छेत्री भारतातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
छेत्रीने आत्तापर्यंत भारतासाठी 142 सामने खेळले असून 92 गोल केले आहेत. तो भारताचा सर्वाधिक गोल करणारा, तर जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलपटू आहे.
सुनील छेत्रीने 12 जून 2005 रोजी भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने पहिला गोलही केला होता.
सुनील छेत्रीने भारतासाठी सर्वाधिक 4 वेळा गोलची हॅट्रिकही साधली आहे.
त्याने भारताकडून तीन वेळा नेहरु कप, दोनवेळा इंटरकॉन्टिनेंटल कप आणि ट्राय नेशन्स कप स्पर्धा जिंकल्या आहेत.
सुनील छेत्रीने भारताचे 20 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील वयोगटातही प्रतिनिधित्व केले आहे.
छेत्रीने त्याच्या कारकिर्दीत सिटी क्लब दिल्ली, जीसीटी, इस्ट बंगाल, डेम्पो, चिराग युनायटेड, मोहन बगान, चर्चिल बर्दर्स, बंगळुरू एफसी, कान्सास सिटी विझार्ड आणि पोर्तुगाल क्लब स्पोर्टिंग या क्लबचेही प्रतिनिधित्व केले आहे.
सुनील छेत्रीने 134 क्लब सामन्यांमध्ये 56 गोल केले आहेत.
छेत्रीने आय लीग, इंडियन सुपर लीग, फेडरेशन कप, सुपर कप, दुरंड कपया स्पर्धा जिंकल्या आहेत.
सुनील छेत्रीला भारत सरकराकडून पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारही त्याला मिळाला आहे. त्याला अर्जून पुरस्कारही मिळाला आहे.