Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने 17 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 10 विकेट्सने पराभूत केले.
या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
दरम्यान, अंतिम सामन्यानंतर भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
कुलदीपने या स्पर्धेत 5 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या.
कुलदीप आशिया चषकात मालिकावीर पुरस्कार जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी 1984 साली सुरिंदर खन्ना यांनी पहिल्यांदा मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.
त्यानंतर 1988 आणि 1995 साली नवज्योत सिंग सिद्धू यांनी मालिकावीर पुरस्कार जिंकला.
2018 च्या आशिया चषकात शिखर धवनने मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.