Yuzvendra Chahal: स्वत:च्याच मीमची मजा घेणारा अतरंगी 'युझी'

Pranali Kodre

वाढदिवस

भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल 23 जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Yuzvendra Chahal | Twitter

यशस्वी फिरकीपटू

चहलला मर्यादीत षटकांमधील भारताच्या यशस्वी फिरकीपटूंमध्ये गणले जाते.

Yuzvendra Chahal | Twitter

टोपननाव

युजवेंद्र चहलला टिल्ली हे टोपननाव त्याच्या सडपातळ अंगकाठीमुळे पडले आहे.

Yuzvendra Chahal | Twitter

अतरंगी चहल

चहल त्यांच्या विनोदी स्वभावामुळे आणि त्याच्या हटके सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या बसण्याच्या स्टाईलमुळे त्याचे मीमही व्हायरल होत असते, ज्याची मजा तो स्वत: देखील घेत असतो.

Yuzvendra Chahal | Twitter

पहिला भारतीय गोलंदाज

चहल आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.

Yuzvendra Chahal | Twitter

कन्कशन सब्टिट्यूट

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून खेळतानाही सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला क्रिकेटर आहे. तो ऑस्ट्रेलिाविरुद्धच्या एका टी२० सामन्यात दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाचा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून खेळला होता.

Yuzvendra Chahal | Twitter

चेसमध्येही भारताचे नेतृत्व

चहलने भारताचे चेस या खेळातही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. तो 2003 मध्ये ग्रीसला झालेल्या वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता.

Yuzvendra Chahal | Twitter

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

चहलने जून 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 72 वनडे सामने खेळताना 121 विकेट्ल घेतले आहेत. तसेच टी20 मध्ये त्याने 75 सामन्यांमध्ये 91 विकेट्स घेतले आहेत.

Yuzvendra Chahal | Twitter

आयपीएल

चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज असून त्याच्या नावावर 145 सामन्यांत 187 विकेट्सचा समावेश आहे.

Yuzvendra Chahal | Twitter
Trent Boult | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी