Pranali Kodre
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा 10 जुलैला वाढदिवस असतो.
गावसकरांना क्रिकेटचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले आहे. त्यांचे मामा माधव मंत्री हे देखील भारताकडून खेळले आहेत. तसेच क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ हे सुनील गावसकरांचे मेव्हणे आहेत. गावसकरांचा मुलगा रोहनही भारताकडून क्रिकेट खेळला.
गावसकर त्यांच्या प्रथम श्रेणी पदार्पणात कर्नाटकविरुद्ध शुन्यावर बाद झाले होते.
इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर 1974 मध्ये झालेल्या कसोटीदरम्यान फलंदाजी करताना सातत्याने केस डोळ्यावर येत असल्याने त्यांनी अंपायरला केस कापण्यास सांगितले होते.
वेस्ट इंडिजचे रोहन कन्हाई हे सुनील गावसकरांचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव रोहन असे ठेवले.
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे गावसकर पहिले क्रिकेटपटू आहेत.
गावसकरांनी 'सावली प्रेमाची' या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली होती. तसेच नसरुद्दीन शाह यांच्या मालामाल चित्रपटातही त्यांनी केमियो केला होता.
गावसकरांनी 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला' हे मराठी गाणेही गायले आहे.
गावसकर 1983 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होते.
गावसकरांनी 47 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून 9 सामने जिंकले आहेत, 8 सामने पराभूत झाले आहेत आणि 30 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच त्यांनी 37 वनडे सामन्यात नेतृत्व करताना 14 विजय आणि 21 पराभव स्विकारले आहेत. 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.