Pranali Kodre
भारताचा एमएस धोनीला ८ वर्षांची मुलगी असून तिचे नाव झिवा आहे. तिचे फोटो बऱ्याचदा धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर शेअर करत असते.
झिवा सध्या रांचीतीलच शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत आहे.
झिवा रांचीतील तौरियन वर्ल्ड स्कूलमध्ये शिकते.
तौरियन वर्ल्ड स्कूल ही आंतरराष्ट्रीय शाळा असून TWS म्हणूनही ओळखली जाते. या शाळेत बोर्डिंगची सुविधाही आहे.
या शाळेला सीबीएसईची मान्यता आहे. तसेच ती रांचीतील सर्वोत्तम शाळांपैकी एक मानली जाते.
या शाळेत विविध खेळांव्यतिरिक्त विविध उपक्रमही राबवले जातात.
मीडियातील रिपोर्ट्सनुसार या शाळेत एलकेजी ते पहिलीपर्यंतची शाळेची फी २ लाख ५० हजार रुपये आहे. दुसरी ते आठवीपर्यंतची फी २ लाख ७५ हजार रुपये आहे. तसेच नववी ते बारावीपर्यंतही फी ३ लाख ५ हजार रुपये आहे.
रिपोर्ट्सनुसार जर बोर्डिंगमध्येही प्रवेश घेतला, तर ४ लाख ४० हजार रुपये फी आहे.