Pranali Kodre
भारतीय कसोटी संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
या कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज संघात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी हार्दिक पंड्याचा भारतीय संघात समावेश आहे.
अशात हार्दिकने या मालिकांसाठी तयारी सुरु केली असून तो बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.
हार्दिकचे जीममधील फोटो व्हायरल झाले आहेत.
लवकरच तो वनडे आणि टी20 मालिकासाठी वेस्ट इंडिजला जाईल.
हार्दिक वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.
तसेच टी20 मालिकेसाठी तो भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील वनडे मालिका 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर 3 ते 13ऑगस्ट दरम्यान टी20 मालिका खेळली जाणार आहे.