Rahul sadolikar
तुमसे अच्छा कौन है या चित्रपटातून नकुल कपूरने आपल्या करिअरची सुरुवात केली. नकुलच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. यानंतर नकुल कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. अभिनय कारकीर्द सोडून तो कॅनडाला गेला.
हा अभिनेता परदेशात स्थायिक झाला जेव्हा त्याचे करियर फ्लॉप झाले, ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन महिलेशी लग्न करून तो आता अमेरिकेतच स्थायिक झाला आहे.
बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी माधुरी करिअरच्या शिखरावर असतानाही इंडस्ट्रीतून बाहेर पडली माधुरीने डॉ. श्रीराम नेनेंशी ऑक्टोबर 1999 मध्ये लग्न केले. सध्या माधुरी आपल्या पतीसोबत परदेशात स्थायिक झाली आहे.
अनिल कपूरची लाडकी लेक अभिनेत्री सोनम कपूरची अभिनयाची कारकिर्द फारशी यशस्वी ठरली नाही. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 2018 मध्ये लग्न केले . सोनम सध्या पतीसोबत परदेशात राहते.
मोहब्बतें हा 2000 साली रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटातील त्याचा चॉकलेटी बॉय लूक पाहून तो मुलींमध्ये खूप लोकप्रिय झाला.पण ही लोकप्रियता फार काळ टिकू शकली नाही आणि त्याची कारकीर्द खराब झाली. त्यानंतर जुगल अमेरिकेत शिफ्ट झाला.
मयूर राज वर्मा यांना एकेकाळी ज्युनियर अमिताभ बच्चन म्हटले जायचे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका केल्या. मिळालेल्या माहितीनुसार मयुरनेही भारत सोडून तो परदेशात स्थायिक झाला आहे