Pranali Kodre
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला.
हा भारतचा वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सलग 6 वा विजय होता. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
त्यामुळे रोहितच्या नावावर सलग 6 वर्ल्डकप सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.
मात्र, तो भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर एमएस धोनी असून त्याने 2011 आणि 2015 वर्ल्डकपमध्ये मिळून कर्णधार म्हणून सलग 11 विजय मिळवले आहेत.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याने 2003 साली कर्णधार म्हणून सलग 8 सामने जिंकले होते.
धोनी आणि गांगुली यांच्या पाठोपाठ आता सलग 6 विजयांसह रोहित शर्मा आहे.
तसेच चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि कपिल देव हे संयुक्तरित्या आहेत.
विराटने 2019 वर्ल्डकपमध्ये, तर कपिल देव यांनी 1987वर्ल्डकपमध्ये भारतीय कर्णधार म्हणून प्रत्येकी सलग 5 विजय मिळवले.