Pranali Kodre
चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा रंगली होती.
या स्पर्धेत खेळताना भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 100 हून अधिक पदके जिंकली.
भारताने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 107 पदके जिंकली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला.
ही पदके मिळवताना अनेक विक्रमही रचले गेले आणि अनेक खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळाली.
भारताने सर्वाधिक पदके ऍथलेटिक्समध्ये मिळाली आहेत. भारताने ऍथलेटिक्समधील विविध प्रकारात मिळून भारताने 29 पदके जिंकली आहेत.
भारताने नेमबाजीत 22 पदके जिंकली, तसेच तिरंदाजीमध्ये एकूण 9 पदके जिंकली, तर कुस्तीमध्ये ६ पदके जिंकली.
बॉक्सिंग, रोइंग आणि स्क्वॅशमध्ये भारताने प्रत्येकी 5 पदकांची जिंकली. बॅडमिंटनमध्येही भारताला 3 पदके मिळाली. तसेच सेलिंगमध्येही भारताने 3 पदके जिंकली.
त्याचबरोबर रेगू-सेपक टेकराव, वूशू, ब्रिज, कॅनोए, गोल्फ आणि टेबल टेनिस या खेळांमध्ये भारताला प्रत्येकी 1 पदक मिळाले. बुद्धिबळ, घोडेस्वारी, रोलर स्केटिंग आणि टेनिस या खेळांमध्ये प्रत्येकी 2 पदके मिळाली.
याशिवाय क्रिकेट, हॉकी आणि कबड्डी या सांघिक खेळांमध्येही भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांना मिळून प्रत्येकी 2 पदके मिळाली.