Pranali Kodre
इशान किशन भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज असून सध्या भारताच्या वनडे आणि टी२० संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.
इशान सध्या त्याच्या नव्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.
भारतीय संघ ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे, त्यापूर्वी इशानने नवी हेअर स्टाईल केली आहे.
त्याने त्याच्या नव्या हेअर स्टाईल केल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती.
त्याची ही नवी हेअर स्टाईल प्रसिद्ध स्टायलिस्ट अलीम हाकिमने केली आहे.
काही सोशल मीडिया युजर्स इशानच्या नव्या हेअर स्टाईलची तुलना एमएस धोनीशी करत आहेत.
काही वर्षांपूर्वी एमएस धोनीनेही काहीशी अशीच म्हणजे मधली केस उभी असलेली आणि बाजूचे केस बारीक असणारी हेअर स्टाईल केली होती.
दरम्यान, दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागेवर इशानला आगामी आशिया चषक २०२३ आणि वर्ल्डकर २०२३ स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.