Pranali Kodre
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 12 जुलैपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे.
भारताकडून या सामन्यातून यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांचे कसोटी पदार्पण झाले आहे.
जयस्वालचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील आहे. त्यामुळे जयस्वाल भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 394 वा खेळाडू आहे.
ईशानने यापूर्वी भारताकडून वनडे आणि टी20 क्रिकेट खेळले आहे. पण त्याचा कसोटीतील हा पहिलाच सामना आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ईशान आणि जयस्वाल 306 आणि 307 वे खेळाडू ठरले आहेत.
इशानला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या हातून कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली.
जयस्वालला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या हातून कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली.
रोहितने इशान आणि जयस्वालला सामन्याची मजा घेण्याचा आणि पहिल्या कसोटीत खास आठवणी तयार करण्याचा सल्लाही दिला.