गोमन्तक डिजिटल टीम
WTC स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने सलग दुसऱ्यांदा स्थान मिळवले.
यंदा WTC स्पर्धेची अंतिम फेरी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने केली आहे. त्याने 19 सामन्यांत 82 बळी मिळवले आहेत.
फलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यंदाच्या WTC मध्ये इंग्लंडच्या जो रूटने सर्वाधिक 1915 धावा केल्या आहेत.
या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी आर अश्विनने केली आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 61 बळी मिळवले आहेत.
भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी चेतेश्वर पुजाराने केली आहेत. त्याने 16 सामन्यांमध्ये 887 केल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या WTC स्पर्धेत इंग्लंडच्या जो रूटने 22 सामन्यांमध्ये 8 शतके नोंदवली आहे. रूटची ही शतके यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक आहेत.
गेल्या WTC स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने बाजी मारत पहिली WTC स्पर्धा जिंकली होती.