टीम इंडियाची सर गॅरी सोबर्स यांच्याशी 'ग्रेट भेट'

Pranali Kodre

वेस्ट इंडिज दौरा

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून या दौऱ्यातील सामन्यांना 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

Team India | Dainik Gomantak

मालिका

भारतीय संघाला 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.

Team India | Twitter

सराव

या मालिकांसाठी सध्या भारतीय संघ बार्बाडोसमध्ये जोरदार तयारी करत आहे.

Team India | Twitter

ग्रेट-भेट

याचदरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंनी वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांचीही भेट घेतली.

Rohit Sharma and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

पत्नीचीही सोबत

भेटीदरम्यान सोबर्स यांच्यासमवेत त्यांची पत्नीही होती.

Shardul Thakur and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

व्हिडिओ

बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा आणि सोबर्स पती-पत्नीच्या भेटीचा व्हिडिओही शेअर केला आहे.

R Ashwin and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

ओळख

या भेटीदरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने काही खेळाडूंची ओळखही सोबर्स यांना करून दिली.

Rahul Dravid and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

उदयोन्मुख फलंदाज

द्रविडने शुभमन गिलची ओळख करून देताना सांगितले की 'आमच्या उदयोन्मुख फलंदाजांपैकी एक'.

Shubman Gill and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

सिनियर खेळाडूंचीही भेट

विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे अशा सिनियर खेळाडूंनीही सोबर्स यांची भेट घेतली.

Ajinkya Rahane and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak

पुरस्कार

विशेष गोष्ट अशी की सोबर्स यांच्या नावाने आयसीसीकडून दरवर्षी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूला 'सर गारफिल्ड सोबर्स' पुरस्काराने सन्मानित केले जाते.

Virat Kohli and Sir Garfield Sobers | Dainik Gomantak
Indian Football Team | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी