Pranali Kodre
भारतभरात ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जात आहे.
भावंडांच्या प्रेमाचा सण म्हणून रक्षाबंधनाला ओळखले जाते. एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन भावंडे यादिवशी एकमेकांना दिले जाते.
दरम्यान क्रिकेटमध्येही काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या मोठ्या भावामुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा रमाकांत अचरेकर सरांकडे त्याचा मोठा भाऊ अजित घेऊन गेला होता.
त्यानंतर आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने क्रिकेटचे धडे गिरवले. यावेळी अजित स्वत:च्या क्रिकेटचा त्याग करत सचिनच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता.
सचिनला त्याची पहिली बॅटही त्याची मोठ्या बहिणीने घेऊन दिली होती.
सौरव गांगुलीने त्याचा मोठा भाऊ स्नेहाशिषमुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
विशेष म्हणजे स्नेहाशिष आजारी पडल्याने त्याच्याच जागेवर बंगाल संघात सौरवला पदार्पणाची संधी मिळाली होती.
गमतीची गोष्ट म्हणजे स्नेहाशिष डावखुरा असल्याने त्याचे साहित्य वापरून सौरवही डाव्या हाताने फलंदाजी करू लागला.
भारताची फलंदाज स्मृती मानधनानेही मोठा भाऊ श्रवणला पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
मानधनानेही गांगुलीप्रमाणेच मोठा भाऊ डावखुरा असल्याने त्याला पाहून डाव्या हाताने फलंदाजी करायला सुरुवात केली.