Pranali Kodre
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव 14 सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
सूर्यकुमारला भारताचा 'मिस्टर 360' म्हणूनही ओळखले जाते. विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये.
सूर्यकुमारने भारताकडून 2021 साली वनडे आणि टी20 पदार्पण केले. तसेच 2023 च्या सुरुवातील कसोटी पदार्पण केले. त्यामुळे तो वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
सूर्यकुमार एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करणारा भारताचा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने 2022 वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमारने 2022 सालचा आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू पुरस्कार जिंकला आहे.
सूर्यकुमारने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 1 कसोटी, 26 वनडे आणि 53 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
सूर्यकुमारने कसोटीत 8 धावा केल्या असून वनडेत 24 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20क्रिकेटमध्ये 3 शतकांसह 46.02 च्या सरासरीने 1841 धावा केल्या आहे.