Pranali Kodre
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 27 ऑगस्ट रोजी रात्री वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
नीरजने आत्तापर्यंत अनेकदा भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी नोंदवली आहे. त्याने आत्तापर्यंत जिंकलेल्या महत्त्वाच्या पदकांवर एक नजर टाकू.
टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यावेळी तो ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला होता.
युजिनला झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत नीरजने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.
नीरज चोप्राने डायमंड लीग 2022 मध्ये विजेतेपद जिंकत इतिहास रचला होता.
जकार्ताला झालेल्या एशियन गेम्स 2018 मध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
गोलकोस्टला झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धा 2018 मध्येही नीरजने सुवर्णपदक जिंकले होते.
एशियन चॅम्पियनशीप 2017 स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदक जिंकले होते.
साऊथ एशियन चॅम्पियनशीप 2016 स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.