Pranali Kodre
भारतीय हॉकी संघाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 विजेतेपदावर नाव कोरले.
आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नईत 12 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध मलेशिया हॉकी संघात झाला होता.
अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियावर 4-3 अशा गोलफरकाने विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
भारताने चौथ्यांदा आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
साल 2023 आधी भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.
आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारताने साखळी फेरीत 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तसेच एका सामन्यात बरोबरी साधली होती. उपांत्य फेरीत भारताने जपानला 5-0 अशा फरकाने पराभूत केलेले, तर अंतिम सामन्यात भारताने मलेशियाला मात दिली.
हॉकी इंडियाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसाठी दीड लाख अशी रोख रकमेच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.