Pranali Kodre
भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू लवकरच राजकारणात प्रवेश करताना दिसू शकतो.
मीडियातील रिपोर्ट्सनुसार रायुडूने म्हटले आहे की 'लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे.
रायुडू सध्या त्याच्या गुंटूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात फिरून लोकांना भेटत आहे.
पण, रायुडू अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे, हे स्पष्ट केलेले नाही. पण सध्या चर्चा आहे की तो वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतो.
काहीदिवसांपूर्वी रायुडू आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही भेटला होता. पण त्यांच्या भेटीमागील हेतू स्पष्ट करण्यात आला नव्हता.
रायुडूने मे 2023 च्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. ते त्याने वैयक्तिक सहावे आयपीएल विजेतेपद ठरले. त्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून प्रत्येकी 3 विजेतीपदे जिंकली आहेत.
अंबाती रायुडूने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 वनडे आणि 6 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 1694 धावा केल्या आहेत. तसेच टी२० मध्ये 42 धावा केल्या आहेत.
रायुडूने आयपीएलमध्ये 204 सामने खेळले असून 127.54 स्ट्राईक रेटने 4348 धावा केल्या आहेखत. यामध्ये 1 शतकाचा आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.