Pranali Kodre
बीसीसीआयच्या निवड समितीने 21 ऑगस्ट रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.
आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला संधी मिळाली आहे.
याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर यांचेही दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
आशिया चषकासाठी 17 जणांच्या भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे, तर उपकर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवण्याच आले आहे.
धक्कादायक गोष्ट अशी की अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला वागळण्यात आले आहे.
याशिवाय संजू सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
फलंदाज - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
यष्टीरक्षक - ईशान किशन, केएल राहुल
अष्टपैलू - हार्दिक पंड्या (वेगवान गोलंदाजी), रविंद्र जडेजा(फिरकी गोलंदाजी), अक्षर पटेल (फिरकी गोलंदाजी)
वेगवान गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा
फिरकी गोलंदाज - कुलदीप यादव
राखीव खेळाडू - संजू सॅमसन