टीम इंडियाची टी20 क्रिकेटमध्ये 'डबल सेंच्युरी'

Pranali Kodre

टी20 मालिका

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे.

India vs West Indies | Twitter

त्रिनिदादमध्ये सामना

या टी20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये झाला.

Tilak Verma | Mukesh Kumar | Twitter

डबल सेंच्युरी

हा सामना भारताचा 200 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे.

Team India | Twitter

दुसराच संघ

भारत 200 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा पाकिस्ताननंतरचा दुसराच संघ बनला आहे.

Team India | Twitter

पाकिस्तान

पाकिस्तानने 223 टी20 सामने खेळले आहेत.

Pakistan Team | Twitter

भारताची कामगिरी

भारताने यापूर्वी खेळलेल्या 199 टी20 सामन्यांपैकी 127 सामने जिंकले आहेत. तसेच 63 पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर 4 सामने बरोबरीत सुटले आहेत, तर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

Team India | Twitter

पहिला टी20 सामना

भारताने त्यांचा क्रिकेट इतिहासातील पहिला सामना 2006 साली 1 डिसेंबर रोजी खेळला होता. हा सामना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला खेळला होता.

Team India | Twitter

पहिला विजय

पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

Team India | Twitter
Sunil Chhetri | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी