Pranali Kodre
इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय संघासाठी हा आयसीसी स्पर्धेत खेळलेल्या एकूण ११ अंतिम सामन्यांतील सहावा पराभव होता.
त्यामुळे भारतीय संघाने आता सर्वाधिकवेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतम सामन्यात पराभूक होणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंडची बरोबरी केली आहे.
इंग्लंडनेही आत्तापर्यंत खेळलेल्या आयसीसी स्पर्धांच्या ९ अंतिम सामन्यांपैकी ६ सामन्यात पराभव पाहिले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका असून त्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये खेळलेल्या ७ अंतिम सामन्यांमध्ये ४ वेळा पराभव स्विकारला आहे.
यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ असून या चारही संघांनी आयसीसी स्पर्धांच्या प्रत्येकी ३ अंतिम सामन्यात पराभव स्विकारला आहे.
ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या आयसीसी स्पर्धांच्या एकूण १२ अंतिम सामन्यांमध्ये हे ३ सामने पराभूत झाले आहेत.
वेस्ट इंडीज आयसीसी स्पर्धांमधील ८ अंतिम सामन्यांमध्ये खेळताना ३ सामने पराभूत झाले आहेत.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आयसीसीचे आत्तापर्यंत 6 अंतिम सामने खेळले असून 3 सामने पराभूत झाले आहेत.